मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशन परिसरात आगरकर चौकात बसला भीषण आग लागली



संध्याकाळी 6:30 च्या सुमारास बेस्टची बस प्रवासासाठी निघत असताना आग लागली.



आग लागली असल्याचे समजताच बसमधून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.



घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी तातडीने धाव घेतली.



अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर केले.



आगीच्या घटनेमुळे परिसरात वाहतूक कोंडी आणि लोकांची गर्दी झाली होती.



या आगीत बेस्टची बस संपूर्णपणे जळून खाक झाली.



गेल्या काही दिवसांमध्ये बेस्टच्या बसमध्ये आग लागण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.



अग्नितांडवामुळे बस प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



बेस्ट प्रशासनाकडून या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे.