कोरोनाच्या मागील काही लाटांमध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळले होते.

शिवाय अनेक दिवस राज्याच्या राजधानीत लॉकडाऊन देखील होता

त्यामुळं आता जगभरात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता मुंबई पालिका प्रशासन सतर्क झालं आहे.

नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावावे

सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे

वेळोवेळी हात व्हावे व स्वच्छता बाळगावी

आजारी वाटल्यास किंवा लक्षणे जाणवल्यास घरी थांबावे

ज्येष्ठ नागरिक त्यासोबतच डायबिटीक किंवा हायपर टेन्शन रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे

सर्व नागरिकांनी लसीकरण पूर्ण करून बूस्टर डोस घ्यावा.

गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्यासह सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याबाबत सूचना बीएमसीनं दिल्या आहेत.