मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे.

कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे.

आज मुंबईत 659 रुग्णांची नोंद झाली आहे.

वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे.

मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी 1289 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 90 हजार 103 वर पोहोचली आहे.

मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 620 झाली आहे.

सध्या मुंबईत 6,409 रुग्ण आहेत.

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 762 दिवसांवर गेला आहे.