मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या मुंबईसह महाराष्ट्रात वाढत आहे. आज मुंबईत 332 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत मंगळवारी 477 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,08,767 वर पोहोचली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97.8 टक्के इतका झाला आहे. मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 5,071 रुग्ण आहेत.