मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे.

कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे.

आज मुंबईत 286 रुग्णांची नोंद झाली आहे.

वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे.

मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

मुंबईत शनिवारी 265 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,03,025 वर पोहोचली आहे.

मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे.

मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 649 झाली आहे.

सध्या मुंबईत 1,817 रुग्ण आहेत.