नुकताच सापाच्या विषाची तस्करी केल्याचा आरोप असलेल्या एल्विश यादववरुन महाराष्ट्रात राजकीय वाद सुरु असल्याचं पाहायला मिळालं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर अंमली पदार्थ, कोकेन, सोनं पाठोपाठ आता सापांची तस्करी केल्याचं वृत्त समोर येत आहे.
बँकॉक वरून आलेल्या प्रवाशाकडून 11 परदेशी प्रजातीचे साप जप्त करण्यात आले आहेत.
महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्तीची कारवाई केल्याची माहिती मिळत आहे.
बिस्किट आणि केकच्या पाकिटातून केली परदेशी सापांची तस्करी बँकॉक वरून आलेले प्रवासी 'हे' करत असल्याचं दिसून आलं.
जप्त केलेल्या सापांमध्ये नऊ Ball Pythons (python regius) प्रजातीचे तर इतर साप corn snakes (pantherophis guttatus) या प्रजातीचे साप आढळून आले जे जप्त करण्यात आले आहे.
परदेशी जातीचे साप असल्याने त्यांना तात्काळ बँकॉकला परत पाठवले जाणार, असल्याची माहिती आहे.
११ सापांची तस्करी रोखण्यात महसूल गुप्तचर संचालनालयाला मोठं यश आलं आहे.
महसूल गुप्तचर संचालनालयालाने मोठी कारवाई करत मुंबई विमानतळावर होणारी सापांची तस्करी उघड केली आहे