देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी बाप्पाचे आगमन झाले. अँटिलियामध्ये अंबानी कुटुंबाने गणपती बाप्पाचे स्वागत करत मनोभावे आरती केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील कुटुंबासह मुकेश अंबानींच्या बाप्पाच्या दर्शनासाठी पोहचले. आकाश आणि अनंत अंबानी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले नीता अंबानी यांनी फोटोग्राफरर्स यांनाही गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देत आभार मानले. मुकेश अंबानी यांच्यासाठी आजचा दिवस खास होता. आजपासून जिओ एअर फायबर लाँच झाले.