एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता, कधी मशीनमध्ये पैसे नसतात, असं तुमच्यासोबतही कधी झालं आहे का? यावेळी, तुम्ही कधी विचार केला आहे की, एटीएममध्ये किती पैसे असतात. एटीएम मशीनमध्ये एकूण किती पैसे असतात, आज या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या. एटीएम (ATM) म्हणजे ऑटोमेटेड टेलर मशीन (Automated teller machine). एटीएम मशीनमध्ये पैशांसाठी ट्रे असतात, ज्याला स्लॉट असं म्हटलं जातं. एटीएममध्ये 100, 200, 500 अशा नोटांची विभागणी करुन जमा केले जातात. एटीएम मशीनमध्ये चार स्लॉट असतात. या प्रत्येक स्लॉटमध्ये 22 कप्पे असतात. एका कप्प्यात 100 नोटा भरता येतात. एटीएम मशीनमध्ये संबंधित बँक पैसे जमा करते. हे काम बँकेचे ठराविक कर्मचारी करतात. एका एटीएम मशीमध्ये सुमारे 88 लाख रुपये रक्कम जमा केली जाऊ शकते. मात्र, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँक एटीएम मशीनमध्ये 12 लाखांपेक्षा जास्त पैसे ठेवू शकत नाही. दरम्यान, एटीएम मशीन कोणत्या भागात आहे, यानुसार बँक संबंधित एटीएममध्ये किती पैसे ठेवायचे हे ठरवते ग्रामीण भागातील लोक एटीएमचा वापर क्वचितच करतात, त्यामुळे ग्रामीण भागातील एटीएम मशीनमध्ये सुमारे 4 ते 5 लाख रुपयेच ठेवले जातात. शहरी भागातील लोक एटीएमचा जास्त वापर करतात, त्यामुळे या भागातील एटीएम मशीनमध्ये 8 ते 12 लाख रुपये ठेवले जातात.