ऑगस्ट महिन्यात महागाई 6.83 टक्के होती, पण 13 राज्यांमध्ये महागाईचा दर यापेक्षा जास्त होता. सर्वात जास्त 8.6 टक्के महागाई राजस्थानमध्ये होती. हरियाणा आणि तेलंगणातील नागरिकांवर 8.27 टक्के महागाईचा बोजा पडला. ओदिशामध्ये महागाईचा दर 8.23 टक्के राहिला. तर झारखंडमध्ये महागाई 7.91 टक्के होती. सर्वात कमी 3.09 टक्के महागाई दिल्लीत होती. आसाममध्ये महागाईचा दर केवळ 4.01 टक्के नोंदवण्यात आली. पश्चिम बंगालमधील नागरिकांना 4.79 टक्के महागाईचा सामना करावा लागला. जम्मू काश्मीरमध्ये साडे पाच टक्क्यांपेक्षा कमी महागाई दर होता. छत्तीसगडमध्ये महागाईचा दर 5.52 टक्के नोंद करण्यात आला.