'दिल, दोस्ती, दुनियादारी' या मालिकेतून मराठी मनोरंजन सृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे स्वानंदी टिकेकर. आरती अंकलीकर-टिकेकर आणि उदय टिकेकर यांची कन्या स्वानंदी. हटके अंदाजासाठी आणि हरहुन्नरी व्यक्तिरेखेसाठी रसिकांच्या मनावर ठसा उमटवत स्वानंदीने तिचा एक वेगळा चाहतावर्ग तयार केला आहे. स्वानंदी सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. लाल साडी आणि कला चष्मा घालून स्वानंदी एकदम कुल दिसत आहे. स्वानंदीने हा लूक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरच्या लग्नासाठी केला होता.