अनेक कलाकारांना ट्रोलर्स हे त्यांच्या फॅशन आणि फिगरवरून ट्रोल करत असतात.



काही सेलिब्रिटी या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देतात.



नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये मृणाल ठाकूरनं बॉडी शेमिंगबाबत सांगितलं.



मुलाखतीमध्ये मृणालनं सांगितलं, ट्रोलर्स तिची फिगर पाहून तिला 'मटका' असं म्हणत होते.



ट्रोलर्स आणि बॉडी शेमिंगबाबत मृणाल म्हणाली, 'ट्रोलर्स माझ्या कर्वी फिगरमुळे मला ट्रोल करत होते. माझ्या शरीराचा आकार असाच आहे.'



मृणाल पुढे म्हणाली, 'ट्रोलर्समुळे माझ्यातीलआत्मविश्वास कमी झाला होता. पण लोक मला मटका म्हणत होते, या गोष्टीचं मला वाईट वाटतं नव्हतं त्याबद्दल मला अभिमान वाटतो.'



'झिरो फिगर असणं गरजेचं नाहिये. फिट आणि निरोगी राहणं गरजेचं आहे. ', असंही मृणाल म्हणाली.



मृणालचा जर्सीचा हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे.



चित्रपटामधील मृणाल आणि शाहिदच्या केमिस्ट्राला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.



मृणाल ठाकूरने याआधी बाटला हाऊस, सुपर 30, घोस्ट स्टोरीज, धमाका या हिंदी चित्रपटात साकारलेल्या भूमिकांचे कौतुक झाले आहे.