मराठमोळी, मुंबईकर सोनल काळेने 'मिस आशिया ग्रेट ब्रिटन'चा किताब आपल्या नावावर केला आहे.
ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. सोनलने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.
सोनलचा जन्म महाराष्ट्रातील मराठी कुटुंबात झाला
त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ती लंडनला गेली. तेथील एका गुजराती व्यक्तीसोबत लग्न केलं.
आता तिचे आई-वडील मुंबईत राहत असून त्यांना आपल्या लेकीचा अभिमान आहे
सोनल ही एक इन्फ्लुएंसर, फ्रीस्टाइल बॉलिवूड कोरिओग्राफर आणि कंटेन्ट क्रिएटर देखील आहे.
'मिस आशिया ग्रेट ब्रिटन' स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतर सोनलने खास पोस्ट केली होती
तिने लिहिलं होतं,Mrs Asia GB या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा माझा उद्देश अधिक आत्मविश्वास मिळवणे हा आहे
सोनल सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे.
'चायवाली लडकी' म्हणून ती लोकप्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
मराठी पाऊल पडते पुढे! 'मिस आशिया ग्रेट ब्रिटन'चा किताब मराठमोळ्या सोनल काळेच्या नावावर