कॅनडाचे वाणिज्य दूतावास म्हणून महाराष्ट्रामधील साताऱ्यातील सोळा वर्षीय मुमताज मुलानीला कॉन्सुल जनरल बनण्याची संधी आज मिळाली.

मुंबईतील कॅनडाचे वाणिज्य दूतावासाकडून 7 ऑक्टोबर 2022 रोजी एक दिवसासाठी महावाणिज्यदूत कार्यक्रम राबवण्यात आला. 

यात मानदेशी फाउंडेशन या  NGO च्या सहकार्याने मुमताज मुलानी या साताऱ्याच्या मुलीला कॅनडाचे मुंबईतील महावाणिज्यदूत म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

16 वर्षीय मुमताज ही साताऱ्यातील पुलकोटी गावातील तरुण कुस्तीपटू आहे.

आज एक दिवस संपूर्ण तिने कॉन्सुलचे जीवन जगले.

मुमताजसारख्या तरुण मुलींना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि आयुष्यात समर्थ बनवण्यासाठी कॅनडा कॉन्सुलचा या मागे हेतू होता.

त्यामुळे आज सकाळी आठ वाजता कॅनडाच्या कॉन्सिलेट जनरल यांनी आपला पदभार मुमताजला सोपवला.

नंतर मुमताजने संपूर्ण दिवस मुंबईतील कॅनडाच्या वाणिज्य दूतावासाचे कार्यालय सांभाळलं आणि काम देखील केलं.

ही संधी मिळताच दिवसभरात मुमताजने अनेकांसोबत बैठका घेतल्या.