भेसळयुक्त दूध प्यायल्याने अनेक गंभीर आजार होण्याचा धोका असतो. तज्ञांच्या मते, दुधाची स्वतःची चव असते. खऱ्या दुधाची चव थोडी गोड असते. बनावट दुधात डिटर्जंट आणि सोडा मिसळला जातो. त्यामुळे भेसळयुक्त दूध कडू होते. डिटर्जंट असलेल्या दुधात सामान्यपेक्षा जास्त फेस असतो. डिटर्जंट ओळखण्यासाठी, काचेच्या बाटलीत 5 ते 10 मिली दूध घ्या आणि ते जोराने हलवा. जर त्यात फेस तयार झाला आणि बराच काळ टिकून राहिला तर दुधात डिटर्जंट मिसळले जाऊ शकते. रंगानुसार खरे आणि बनावट दूधही ओळखता येते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, खऱ्या दुधाच्या रंगात कोणताही बदल होत नाही, तर भेसळयुक्त दूध पिवळे होऊ लागते. तज्ज्ञांच्या मते, शुद्ध दुधाचा रंग उकळल्यानंतरही बदलत नाही. पण बनावट दूध उकळल्यानंतर ते हलके पिवळे होऊ लागते. दुधात भेसळ आहे की नाही हे पाहण्यासाठी दुधाचे 2 ते 4 थेंब एका लाकडी फळीवर किंवा दगडावर टाका. जर दूध खाली पडताच ते वाहत असेल तर त्यात पाणी किंवा भेसळ आहे. दूध ताजं आणि शुद्ध असेल तर ते जमिनीवर हळूहळू वाहत जाईल. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.