ग्लोईंग त्वचेसाठी करा 'हा' उपाय, चेहरा होईल चमकदार
जर उन्हामुळे तुमचीही त्वचा काळवंडली असेल, तर यावर एक सोपा आणि स्वस्त उपाय आहे. तुमच्या किचनमधील एक पदार्थ तुमची ही समस्या दूर करेल.
दूध आरोग्यासाठीतर खूप फायदेशीर आहेच, त्यासोबत हे त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी उपयुक्त आहे.
दुधाचे त्वचेसाठीही अनेक फायदे आहेत. दुधामध्ये असलेलं लॅक्टिक ॲसिड त्वचेला दुरुस्त करण्याचं काम करते आणि तुमच्या त्वचेवरील ग्लो परत मिळवण्यास फायदेशीर आहे.
तुम्ही चेहऱ्यावर मिल्क आइस क्यूब वापरून अनेक समस्यापासून सुटका मिळवू शकता.
चेहऱ्यावर दूध लावल्याने त्वचा चमकदार होते. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.
रक्ताभिसरणात सुधारणा होऊन त्वचेवर ग्लो येतो. बर्फामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड आणि प्रथिने त्वचेला तजेलदार बनवण्यास मदत करतात.
उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या असली तरी कच्च्या दुधापासून बनवलेल्या आइस क्यूबने चेहऱ्याची मसाज करू शकता.