10 मे 2022 रोजी अभिनेत्री मीनाक्षी राठोड आणि कैलास वाघमारे यांना कन्यारत्न झाले. नुकतेच मीनाक्षी आणि कैलास यांनी त्यांच्या मुलीचे खास फोटो शेअर केले आहेत फोटोला कैलासनं कॅप्शन दिलं, 'स्वागत नहीं करोगे हमारा?' कैलास आणि मीनाक्षीच्या लेकीच्या या क्यूट फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. कैलास आणि मीनाक्षीनं त्यांच्या बाळाचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत अभिनेत्री गिरिजा प्रभू,अंजली पाटील, अभिनेता सारंग साठे या सेलिब्रिटींना या फोटो कमेंट्स केल्या आहेत. कैलास आणि मीनाक्षी यांच्या चाहत्यांनी देखील या फोटोंना लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत. मीनाक्षीनं मुलीसोबत शेअर केलेला हा फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. 'खूप क्यूट', अशी कमेंट अनेक नेटकऱ्यांनी या फोटोला केली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेमध्ये मीनाक्षीनं महत्त्वाची भूमिका साकारली.