छोट्या पडद्यावरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सिद्धार्थ आणि आदितीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. मालिकेत अभिनेता हार्दिक जोशी ‘सिद्धार्थ’ची, तर अभिनेत्री अमृता पवार ‘आदिती’ची भूमिका साकारत आहे. अभिनेत्री अमृता पवार हिला बालपणापासून ‘सीए’ व्हायचं होतं आणि फायनान्स क्षेत्रात करिअर करायचं होतं. मात्र, कॉलेजमध्ये असताना अमृताने अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेत, रंगमंच गाजवला होता. याच दरम्यान तिला अभिनयाची गोडी लागली आणि तिने याच क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. (All PC : pawaramruta/IG)