ज्येष्ठ लेखक विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन Asian Heart Hospital मध्ये घेतला अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 60 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले समता परिषदेच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी हरी नरके पहाटे पुण्याहून मुंबईला येत होते. येताना पहाटे त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. महात्मा फुले अध्यापनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष होते. प्रा. हरी नरके यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत.