पावसाळा सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत महाराष्ट्रात सरासरीच्या 106 टक्के पावसाची नोंद



कोकण सोडता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी



जालन्यात सरासरीच्या फक्त 56 टक्के पाऊस, सांगलीत 35 टक्के पाऊस



साताऱ्यात 73 टक्के, हिंगोलीत 75 टक्के पाऊस



औरंगाबादेत 79 टक्के पाऊस, अहमदनगरमध्ये 81 टक्के पाऊस



अकोला, अमरावती आणि बुलढाण्यात समाधानकारक पाऊस



मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमी



गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर राज्यात आता मॉन्सून ब्रेकची स्थिती



मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील घाट माथ्यावर हलक्या पावसाची शक्यता



सलगच्या होणाऱ्या पावसानंतर राज्यातील पुढील दोन आठवडे कोरडे