अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमी तिच्या बोल्ड लूकसाठी चर्चेत असते. सई महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. सई ताम्हणकरने तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या सई चर्चेत आलीये तिच्या नव्या फोटोशूटमुळे. सईचा हा लूक चांगलाच चर्चेत आलाय. सईने यात करड्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. सध्या सई तिच्या 'पॉंडिचेरी' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.