मराठी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. आतादेखील तिने सुंदर साडीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो एका समारंभातील असल्याचं दिसत आहे. पुजा पारंपरिकच नाही तर वेस्टर्न कपड्यातही फोटो शेअर करत असते. ती अगदी सिंपल लूकमध्येही अनेकदा फोटो पोस्ट करते. तिच्या सर्वच फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पडतो. पूजाचे 'विजेता' आणि 'बळी' नावाचे चित्रपट काही काळापूर्वी रिलीज झाले होते. पुजाच्या नवीन चित्रपटाची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पुजाचे इन्स्टाग्रामवर सद्यस्थितीला 1.6 मिलीयन फॉलोवर्स आहेत. पुजाने बऱ्याच हीट चित्रपटात काम आजवर केलं आहे.