चहा अनेकांना जीव की प्राण असतो. चहा प्रेमी चहाची तलफ भागवण्यासाठी काय करतील याचा नेम नाही.



जेवल्यानंतर चहा पिणं बऱ्याच जणांना आवडतं. पण ही सवय प्रकृतीला घातक ठरु शकते.



चहा पावडरमध्ये आम्ल पदार्थ असतात. हे पदार्थ अन्नातील प्रोटीनमध्ये मिसळतात.



यामुळे प्रोटीन टणक बनतात, परिणामी ते पचायलं जड जातं. यामुळे जेवल्यानंतर तातडीने चहा पिणं टाळावं, असं तज्ञ सांगतात.



याशिवाय चहामध्ये कॅफिनही असतं ज्यामुळे रक्तदाब वाढतो.



चहामध्ये 'पॉलिफेनोल्स' आणि 'टेनिन' इत्यादी घटक असतात, जे जेवणातील लोह शोषत नाहीत, परिणामी शरीरालाही त्याचा फायदा होत नाही.



अनेकांना चहा प्यायल्यानंतर पाणी प्यायल्यानं तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात.



चहा प्यायल्यानंतर पाणी प्यायल्याने पचन क्रिया खराब होईल. तसेच अॅसिडीटीची समस्या जाणवेल.