मराठी रंगभूमी असो, चित्रपट असो किंवा हिंदी कॉमेडी शोज, सिद्धार्थने स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.



सध्या सिद्धार्थ जाधव त्याच्या नव्या नव्या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.



मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या दुबईमध्ये सहकुटुंब सुट्ट्यांचा आनंद लुटतोय.



दुबई म्हटलं की सगळंच लक्झरी! अशाच एका लक्झरी कारसोबत सिद्धार्थने खास फोटोशूट केलं आहे.



‘लीमोजिनी’ या शानदार कारसोबत आपल्या लाडक्या सिद्धूने खास फोटोशूट केलं आहे.



‘किती लांब असेल ही गाडी?’, असं म्हणत त्याने या गाडीसोबतचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



या फोटोंमध्ये त्याच्यासोबत त्याच्या लाडक्या लेकीही दिसत आहेत.



वर्क फ्रंटवर, सिद्धार्थ पुढे मोहम्मद बर्मावाला दिग्दर्शित 'लग्न कल्लोल' या मराठी चित्रपटात दिसणार आहे.



यात मयुरी देशमुख आणि भूषण प्रधान यांसारखे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत.