जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी उपस्थित होते.
100 एकरच्या मैदानात मनोज जरांगेंची सभा आयोजित करण्यात आली होती.
हिंदवी स्वराज्याचे राजे छत्रपती शिवरायांना वंदन करुन आणि उपस्थितांना प्रमाण करुन मनोज जरांगेंनी भाषणाला सुरुवात केली.
मनोज जरांगेंच्या प्रमुख मागण्या नेमक्या काय आहेत.
1. मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा.
2. कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी.
3. मराठा आरक्षणात बलिदान दिलेल्या 45 बांधवांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी द्यावी.
4. दर दहा वर्षाने आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करावा. सर्व्हे करुन प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्या.
5. PHD करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन , त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावे.
6. महाराष्ट्रातील मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्या. NT, VJNT प्रवर्गासारखे टिकणारे आरक्षण द्या.