नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असणारी मलायका तिच्या फिटनेसमुळेही चर्चेत असते वयाची चाळीशी ओलांडलेली असूनही तिचा फिटनेस पाहून अनेक लोक हैराण राहतात. फिटनेसकरता कायम चर्चेत असणारी मलायकाने नुकतेच फोटोशूट केले आहे. मलायका अरोरा आपल्या सौंदर्यानं लाखो चाहत्यांना घायाळ करते. तिचे साडीतले हे फोटो पाहून ती २ मुलांची आई आहे हे सांगताचं येणार नाही. अगदी साध्या पण परफेक्ट लूकमध्येही मलायका प्रचंड सुंदर आणि भन्नाट दिसतेय. मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच वेस्टर्न आणि शॉर्ट्स ड्रेस वेअर करते. पण जेव्हाही मलायका देसी लुक करते तेव्हा तिच्यावर अनेकांच्या नजरा खिळतात. प्रत्येक फोटोमध्ये तिची स्टाईल वेगळी आहे.