मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे.



'कट्यार काळजात घुसली', 'मोकळा श्वास', 'फत्तेशिकस्त', 'नटसम्राट' अशा अनेक चित्रपटातून तिने प्रेक्षकांवर तिच्या अभिनयाची छाप सोडली.



मन फकीरा या चित्रपटाचं तिने दिग्दर्शनसुद्धा केलं आहे.



काही दिवसांपूर्वी मृण्मयीचा चंद्रमुखी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.चंद्रमुखी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.



मृण्मयी नेहमीच तिचे वेगवेगले लूक शेअर करत असते. या वेळी तिने एक इंडो वेस्टर्न लूक शेअर केला आहे.



पिवळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि मॅचिंग पॅन्ट आणि त्यावर जरीचं श्रग अश्या या लूक मध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.



यावर तिने मॅचिंग ऑक्सिडाइज ज्वेलरी परिधान केलीये.



साजेशी हेअरस्टाईल करून तिने हा लूक पूर्ण केला आहे.



तुम्हीही येत्या रक्षाबंधन साठी हा लूक फॉलो करू शकता.