अभिनेत्री कियारा आडवानी अभिनयासह आपल्या फॅशन सेन्सने ओळखली जाते. बघता बघता रक्षाबंधनचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. वर्षातून एकदा येणाऱ्या या दिवसाची प्रत्येक बहिण आतुरतेने वाट बघत असते. तर, या रक्षाबंधनाला तुम्ही सुद्धा भावाला राखी बांधण्यासाठी सुंदर तयार व्हा. तुम्ही तयार हिण्यासाठी कियारा अडवाणीचे हे काही लुक्स फॉलो करू शकता. गुलाबी साडी आणि त्यावर हटके झुमके असा हा लूक तुमच्यावरही शोभून दिसू शकतो. कियाराची हि इंडो वेस्टर्न स्टाईल सध्या चांगलीच ट्रेंड मध्ये आहे. हा एक रक्षाबंधनासाठी परफेक्ट लूक ठरू शकतो. थोडा कमी हेवी लेहेंगा सुद्धा या सणासाठी योग्य ठरेल.