पृथ्वी हा सूर्यमालेतील सुर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे.



पृथ्वीचा पृष्ठभाग विविध स्तरांपासून बनलेला आहे.



पृथ्वीचा पृष्ठभाग 71 टक्के पाण्याने तर 29 टक्के भाग जमिनीने व्यापला आहे.



पृथ्वीचा एकूण पृष्ठभाग क्षेत्रफळ जवळपास 51 करोड किमी आहे.



ते सुमारे 197 दशलक्ष चौरस मैल आहे.



या पैकी 36.113 करोड किमी क्षेत्र समुद्रसपाटीखाली पाण्याने व्यापला आहे.



उर्वरित 14.894 करोड क्षेत्र पर्वत, वाळवंट, सपाट मैदानी जमिनीच्या स्वरूपात वाटला गेला आहे.



मृत समुद्रात जमिनीची उंची सर्वात कमी - 418 मीटर आहे.



समुद्रसपाटीपासून जमिनीच्या पृष्ठभागाची सरासरी उंची 840 मीटर आहे.