तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवीची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली आहे.



या पूजेत श्री तुळजाभवानी आक्रमक रुप धारण करुन हातात त्रिशूळ घेऊन महिषासुराच्या छातीत मारुन त्याचा वध केल्याचं दाखवण्यात आलं आहे.



ज्यावेळी महिषासुराने देवतांना हाकलून दिले आणि स्वत: स्वर्गाचा आनंद भोगू लागला त्यावेळी त्यांनी देवीपार्वतीला विनवणी केली आणि रक्षण करण्याची मागणी केली.



साक्षात पार्वतीचा अवतार असलेली श्री तुळजाभवानी माता सर्व देवांच्या तेजापासून उत्पन्न झालेली जगदंबा माता भवानी आहे.



तिने दैत्यांचा राजा महिषासुरचा वध केला आणि देवतांना स्वर्ग प्राप्तीचा आनंद दिला.



त्यामुळे देवीची महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.



काल रात्री सातव्या माळेच्या दिवशी अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढवण्यात आला.



त्यानंतर धूपारती आणि अंगारा हे नियमित विधी पार पडले.



रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात अश्व वाहनावरुन छबिना मिरवणूक काढण्यात आली