भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता क्रिकेट जगताव्यतिरिक्त चित्रपट निर्मितीमध्ये उतरणार आहे धोनी तमिळ चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. धोनीने अभिनेता रजनीकांतचा जवळचा व्यक्ती असलेल्या संजयची निवड केली आहे या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनी सध्या आयपीएलमध्ये व्यस्त असून या सीझननंतर तो या चित्रपटाची अधिकृत माहिती सांगू शकतो. चित्रपटाचे शूटिंगही याच महिन्यात सुरू होणार आहे. धोनीचे तामिळ चित्रपटसृष्टीशी पूर्वीपासून संबंध आहे.