'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून निखिल बने घराघरांत पोहोचला आहे.
निखिल बने हा मुंबईत राहत असला तरी त्याचं गाव कोकणातील चिपळुन आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेचं गावाकडचं घर खूपच कमाल आहे.
निखिल बनेचं कोकणात टुमदार कौलारू घर आहे.
निखिल नुकताच कुटुंबियांसोबत कोकणात गेला असून फॅमिली ट्रिपचे फोटो आणि व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
निखिलच्या घरातील फोटोंच्या माध्यमातून कोकणची सुंदरता पाहायला मिळत आहे.
निखिलच्या कौलारू घराआसपास हिरवी झाडी पाहायला मिळत आहे.
गावाच्या मातीशी निखिलची नाळ जोडलेली आहे.
निखिल बने अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे.
निखिल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.