'बिग बॉस-16' (Bigg Boss 16) या शोमुळे शिव ठाकरेला (Shiv Thakare) विशेष लोकप्रियता मिळाली. शिव हा बिग बॉस-16 चा रनरअप ठरला. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिधनचा शिव हा विजेता ठरला. शिव हा वेगवेगळ्या लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर करत आहे. नुकतेच शिवने त्याच्या नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शिव हा डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे. शिवचं हे फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीनं केलं आहे. शिव ठाकरेनं हे फोटो शेअर करन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माझी एक इच्छा पूर्ण झाली.' शिव ठाकरेच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. शिवला इन्स्टाग्रामवर 2.3 मिलियन फॉलोवर्स आहेत. शिवचा चाहता वर्ग मोठा आहे.