आज राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला.
मराठी नववर्ष, गुढीपाडव्या निमित्ताने राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या.
मुंबईसह ठाणे, पुणे, कोल्हापूर,नाशिक, छत्रपती संभाजीनगर,
नागपूर यांसारख्या अनेक शहरांमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला.
राज्याच्या विविध भागात मिरवणूक, पारंपरिक वेशभूषा करत गुढीपाडवा साजरा करण्यात आला.
काही ठिकाणी राजकीय नेते मंडळी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी शोभायात्रेत हजेरी लावली.
मुंबई, ठाणे, डोंबिवली येथील शोभायात्रेत तरुणांसह आबालावृद्धांनी हजेरी लावली होती.
मुंबईतील गिरगाव, लालबाग, दादर, चेंबूर, गोरेगाव आदी विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या.
या शोभायात्रेत मल्लखांब प्रदर्शन, पुणेरीसह विविध ढोल ताशा पथके, महिलांचे विशेष झांजपथक,
विविध शोभायात्रा रथांचा सहभाग होता. गिरगावच्या फडके गणेश मंदिरापासून
शोभायात्रेला सुरुवात झालीये. 22 फुटांची गुढी उभारण्यात आली.