यंदा पावसाळा लांबणार?
उष्णतेच्या लाटेत पावसाच्या सारी सुखद अनुभव देऊन जातात
आत्ताच कडक उन्हानं घाम काढला आहे अश्यातच पावसाची ओढ मात्र कायम लागून राहिलेली पाहायला मिळतं
पावसाळा कधी सुरु होणार? या प्रश्नाने आभाळाकडे नजरा खिळून राहिल्या आहेत
नुकताच हवामान विभागानं राज्यातील काही भागात अवकाळी पावासाचा इशारा दिला आहे.
त्यानुसार काही भागात पाऊसही झाला आहे. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
दरम्यान, पाऊस आणि अती गारपीट झाली तर जूनमध्ये येणाऱ्या पावसाला विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्यामुळं आता जास्त होणारा पाऊस पुढे अडचण निर्माण करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सध्या पाऊस पडल्यास शेतकऱ्यांच्या पिकांना जास्त फटका बसणार नाही.
कारण शेतकऱ्यांची बऱ्यापैकी काम उरकली आहेत.