आज राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज



हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.



आज बुधवारी महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांसह देशभरात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.



आज मध्य महाराष्ट, कोकण किनारपट्टी भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.



मुंबई हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, शहरात वादळी वाऱ्यांसह काही भागांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.



मध्य महाराष्ट्रात 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे.



हवामान खात्याने पुणे, नाशिक नागपूर, अमरावती आणि इतर 6 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.



महाराष्ट्रासह देशभरात इतर राज्यांमध्येही पावसाच्या सरी कोसळणार आहे.



हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गोवा, कर्नाटक, केरळमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.



आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणामध्येही जोरदार पाऊसाची शक्यता आहे.



देशातून नैऋत्य मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.



25 सप्टेंबरला वायव्य राजस्थानामधून मान्सून माघारी फिरला आहे.