पालघर जिल्ह्यातील भाताणे गावातील चित्रकार कौशिक जाधव यांनी हाताच्या बोटावरील नखावर छत्रपती शिवाजी महाराज साकारले.



त्यांना हे चित्र साकारण्यासाठी अवघ्या 15 मिनिटं लागली.



कल्याण पूर्वेतील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळातर्फे सहा हजार रोपांच्या माध्यमातून शिवप्रतिमेची छबी साकारण्यात आली आहे.

शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील एका हॉलमध्ये जवळपास पाच हजार स्क्वेअर फूट जागेवर रांगोळीच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंती निमित्त आज परभणीतील स्वराज्य आर्टस् च्या कलाकारांनी भव्य रांगोळी साकारली.

तब्बल 28 क्विंटल रांगोळी वापरून 72 तास अथक मेहनतीतून 14392 चौरस फुटांची रांगोळीची प्रतिकृती साकारून अनोखे अभिवादन केले आहे.



सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड गवाणे येथील चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी तिळाच्या दाण्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र साकारून महाराजांना मानवंदना दिली आहे.

शिवजयंती निमित्ताने ही सूक्ष्म कलाकृती त्यांनी साकारली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बीडच्या गेवराई शहरामध्ये दगड आणि चून्यातून शिवाजी महाराजांची अतिशय रेखीव चित्ररेखा साकारण्यात आली आहे.