राज्यात ठिकठिकाणी होळी आणि धुलिवंदन साजरी करण्याची अनोखी प्रथा परंपरा आहे.
अशीच एक प्रथा बीडमध्ये वर्षानुवर्षे पाळली जात आहे
ही परंपरा म्हणजे जावयाला गाढवावर बसून मिरवण्याची.
राज्यभर धुळवड मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत असतानाच बीडमध्ये मात्र आजच्या दिवशी गावातील जावायाला गाढवावर बसून मिरवत आहे.
मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे ही परंपरा खंडित झाली होती.
त्यामुळे परिसरातील जावई आणि घरजावई यांना सुटकेचा श्वास घेतला होता.
परंतु यंदा होळी आणि धुळवडीला कोणतेहे निर्बंध नसल्याने मोठ्या उत्साहात ही परंपरा पार पडली.
केज तालुक्यातील विडा गावात मागील दहा दशकांपासून धुळवडीच्या दिवशी जावयाला गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा आहे. यावर्षी ही प्रथा जल्लोषात पार पडली.