सोमनाथचे पहिले मंदिर पूर्व-ऐतिहासिक काळापासून अस्तित्वात आहे असे मानले जाते. श्रीशैल्यम् मल्लिकार्जुन हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. हैद्राबादपासून सुमारे 210 कि.मी. अंतरावर आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे हिंदू मंदिर असून ते भगवान शिव यांना अर्पण केलेले आहे. ओंकारेश्वर एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर मध्य प्रदेशच्या खांडवा जिल्ह्यात आहे. परळी वैजनाथ हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. रामेश्वरममध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले रामनाथस्वामी मंदिर आहे. नागनाथ (नागेश्वर) ही एक शिवाची उपाधी असून, या नावाचा एक शैवपंथही अस्तित्वात होता. विश्वेश्वर हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. शंकराचे हे रूप काशीत पूजले जाते. त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. केदारनाथ हे अतिप्राचीन केदारनाथ मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे.