एकीकडे राज्यावर उष्णतेच्या लाटेचं संकट असताना दुसरीकडे वीजेच्या मागणीतही रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे.
राज्यात मंगळवारी विजेच्या मागणीनं उच्चांक गाठला आहे.
मंगळवारी 29 हजार 116 मेगावॅट वीजेची मागणी नोंदवली गेली.
एकट्या मुंबईची वीजमागणी ही 3 हजार 678 मेगावॅटवर पोहचली आहे.
महावितरणच्या ग्राहकांची आजवरची सर्वाधिक वीज मागणी ही एप्रिल 2022 मध्ये 24 हजार 996 मेगावॅट नोंदवण्यात आली होती.
हा आकडा आता 25 हजार 100 मेगा वॅट वीज मागणीसह मागील आठवड्यात मागे पडला होता.
राज्यभरात उष्णतेची लाट पाहता मंगळवारी 18 एप्रिलला दुपारी तीनच्या दरम्यान
महावितरणची वीजमागणी 25 हजार 437 मेगावॅटच्या विक्रमी स्तरावर पोहचली होती.
मुंबईची वीज मागणी ही 3678 मेगावॅटवर पोहचली आहे.
त्यामुळे राज्यभरातील वीज मागणी हे 29,116 मेगावॅट पर्यंत पोहचली आहे.