बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी पक्षी प्रेमींची मांदियाळी



धानोरा येथील तलाव परिसरात सध्या अतिशय सुंदर आणि दुर्मिळ देशी - विदेशी पक्षांचं वास्तव्य



विदर्भात भंडारा जिल्ह्यात फक्त एकच पक्षी अभयारण्य आहे



पश्चिम विदर्भात आता एक नवीन पक्षी अभयारण्य नावारुपास येत आहे.



ते म्हणजे, 'हत्ती पाऊल पक्षी अभयारण्य



फेब्रुवारी महिन्यात देश विदेशातील अनेक दुर्मीळ पक्षी स्थलांतरित होतात



उत्तर टोकातील हिमालयातून तर अरब देशातील आणि युरोपातील पक्षी येतात.



दुर्मीळ पक्षी येत असल्याने हे ठिकाण बुलढाण्यासाठी पर्यटकांचं आता नवीन केंद्र बनत आहे.



पक्षीप्रेमी आणि पक्षी निरीक्षकांची या दिवसात या नवीन अभयारण्यात मांदियाळी बघायला मिळत आहे



जिल्ह्यात पर्यटनाला आणि अर्थात विकासाला मोठा वाव आहे.