गोदावरीच्या नाथ घाटावर 11 हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले दीपोत्सव साजरा करण्यात आला. गोदावरी प्रकट दिनाच्या मुहूर्तावर आज पैठणचा गोदाकाठ दिव्यांनी उजळला भाविकांनी नाथमंदिर परिसरात गर्दी केली पोलिस निरिक्षक किशोर पवार यांच्या हस्ते गोदावरीची पूजा करण्यात आली. आपल्या संस्कृतीत नदीला माता, आई मानतो. त्यामुळे नदीला आपण माँ गंगा,गोदमाई, माता गोदावरी संबोधतो. नदी संवर्धनाचा संदेश देत गोदावरी नदी जन्मोत्सव साजरा गोदावरी नदी अवतरण दिनानिमित्त गोदा आरती करण्यात आली महाआरती करून संपन्न झालाय.