धक धक गर्ल अभिनेत्री माधूरी दिक्षितने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. माधूरीचा ग्लॅमरस लेहेंगा लूक चाहत्यांना खूपच आवडला. माधूरीची फॅशन स्टाईल चाहत्यांना नेहमीच आवडते. दीर्घ काळ बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या माधुरीची आज देखील चाहत्यांच्या मनावर जादू कायम आहे. माधूरी चाहत्यांसाठी आपले नव-नवीन फोटो नेहमीच शेअर करत असते. मजा मा मधून माधूरी लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या फोटोशूटसाठी माधूरी वेगेवेगळ्या पोझ दिल्या आहेत. लेहेंग्यामध्ये माधूरी खूपच सूंदर दिसत आहे. चाहत्यांनी देखील माधूरीचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोशूटमधील माधुरीची स्माईल चाहत्यांना खूपच आवडली आहे.