गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स हे जगभरातील वेगवेगळ्या विक्रमांची अधिकृत नोंद घेणारं आणि प्रमाणित करणारं पुस्तक आहे.
Image Source: pti
या पुस्तकात मानवी कर्तृत्व, नैसर्गिक विक्रम, शारीरिक क्षमता, तंत्रज्ञानातील कामगिरी, प्राण्यांचे विक्रम, खाद्यपदार्थांचे वेगळे प्रयोग अशा असंख्य अनोख्या गोष्टींची नोंद असते.
Image Source: Social Media/X
. दरवर्षी या पुस्तकाचं नवीन आवृत्ती प्रकाशित होते आणि लाखो लोक आपल्या वेगळेपणामुळे या पुस्तकात नावं नोंदवण्याचा प्रयत्न करतात.
Image Source: Social Media/X
आज गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स फक्त पुस्तकापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर टीव्ही शो, सोशल मीडिया आणि विविध स्पर्धांमधूनही विक्रमांची नोंद घेतली जाते.
Image Source: pti
त्यामुळे हे केवळ एक पुस्तक नसून जागतिक पातळीवर लोकांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारं एक मोठं व्यासपीठ ठरलं आहे.
Image Source: Social Media/X
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सची कल्पना सर्वप्रथम सिर ह्यू बीव्हर यांना १९५१ मध्ये एका शिकार मोहिमेदरम्यान सुचली.
Image Source: Social Media/X
युरोपातील सर्वात जलद उडणारा पक्षी कोणता या प्रश्नावर वाद झाला आणि त्यावेळी असं लक्षात आलं की अशा अनेक वादग्रस्त प्रश्नांची उत्तरं कुठेही नोंदवलेली नाहीत.
Image Source: Social Media/X
या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी पत्रकार जुळे भाऊ नॉरिस आणि रॉस मॅकव्ह्हर्टर यांची मदत घेण्यात आली. अखेर १९५५ मध्ये पहिलं गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स प्रकाशित झालं आणि ते लगेचच लोकप्रिय ठरलं.
Image Source: Social Media/X
आज हे पुस्तक जगभरातील अद्भुत, विलक्षण आणि अविश्वसनीय कामगिरींची अधिकृत नोंद करणाऱ्या सर्वात विश्वासार्ह ग्रंथांपैकी एक आहे.