स्वप्नात भरपूर पाणी दिसणे म्हणजे गहन विचार आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
स्वप्नात गाय दिसणे आनंदी आणि समृद्ध जीवनाचे लक्षण आहे.
स्वप्नात जेवण करणे म्हणजे धनलाभ आणि चांगल्या आरोग्याचे संकेत मिळणे होय.
स्वप्नात रुद्राक्ष पाहणे शुभ असते.
स्वप्नात उंचीवरून पडणे, हे आपत्ती किंवा आरोग्याच्या बिघडण्याचे लक्षण असू शकते.
स्वप्नात कपडे धुणं म्हणजे आत्मविश्वासाची कमतरता असणे.
स्वप्नात गर्भवती स्त्री दिसणे म्हणजे संतती सुखाची किंवा नवीन जबाबदारीची चाहूल असू शकते.
स्वप्नात सर्प चावणे म्हणजे जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळवण्याचे संकेत असू शकते.
स्वप्नात काळा कुत्रा दिसणे हे शनिदेव आणि भैरव यांच्या कृपेचे संकेत असू शकते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.