पिंपल्स आलेत? कोणत्या जागेवरचा 'फोड' कोणती धोक्याची सूचना देतो? जाणून घ्या.

Published by: जगदीश ढोले
Image Source: PINTEREST

पिंपल्स कुठे येतात यावरून शरीरात काय आजार आहे, हे समजून येते. बघा, तुमच्या पिंपल्सचं काय सांगत आहेत!

Image Source: PINTEREST

भुवयांवर पिंपल्स – यकृताची काळजी घ्या!

भुवया किंवा त्यावर पिंपल्स दिसत असतील, तर तुमचं लिव्हर योग्य रीतीने कार्य करत नाही. तेलकट अन्न कमी करा आणि शरीर डिटॉक्स करा.

Image Source: PINTEREST

कपाळावर पिंपल्स – पचनक्रिया बिघडली आहे!

वारंवार कपाळावर पिंपल्स येत असल्यास, तुमचं पचन ठीक नाही. हलका आणि फायबरयुक्त आहार घ्या, पाणी प्या, आणि आळस टाळा.

Image Source: PINTEREST

नाकावर पिंपल्स – हृदय आरोग्य तपासा!

नाकाचा संबंध रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलशी असतो. पिंपल्स सतत नाकावर येत असतील, तर हृदयाची तपासणी करून घ्या.

Image Source: PINTEREST

गालांवर पिंपल्स – फुफ्फुसांची काळजी घ्या!

धूम्रपान, धूळ, आणि प्रदूषणामुळे फुफ्फुसांवर ताण येतो. गालांवर पिंपल्स दिसत असतील, तर श्वसनसंस्थेची तपासणी करून घ्या.

Image Source: PINTEREST

कानांवर पिंपल्स – किडनी हेल्थ चेक करा!

कानांवर येणारे पिंपल्स हे मूत्रपिंडांच्या कामात अडथळा असल्याचे लक्षण असू शकते. पुरेसे पाणी प्या आणि खारट पदार्थ कमी करा.

Image Source: PINTEREST

हनुवटीवर पिंपल्स – हार्मोन्स असंतुलित आहेत!

ठोठ्याच्या भागात पिंपल्स येणं हे हार्मोनल बदलांचे लक्षण असू शकते. विशेषतः महिलांनी हार्मोन चाचणी करून घ्यावी.

Image Source: PINTEREST

चेहऱ्यावरील प्रत्येक पिंपल काहीतरी सूचित करत असतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष न करता कारण शोधा आणि शरीराची योग्य काळजी घ्या.

Image Source: PINTEREST

तणाव, चुकीचा आहार, आणि अपुरी झोप हे सगळे पिंपल्स वाढवतात. त्यामुळे नियमित वेळेवर झोप, योग्य आहार आणि व्यायाम आवश्यक!

Image Source: PINTEREST

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: PINTEREST