AC चा वापर

जर तुम्ही AC चा वापर करत असताना वीज बिलमुळे चिंता होत असेल तर ही माहिती तुमच्या खुप फायदेशीर राहणार आहे.

आणि तुम्हाला या उन्हाळ्यात गरमीच्या त्रासा पासून बचाव होईल.

जर तुम्ही या ट्रिक वापरल्या तर तुमच्या AC चे वीज बिल कमी येईल आणि AC सुध्दा मेंटेन राहील.

AC ची सेटिंग बरोबर करा

AC ला 24 - 26 च्या डिग्री वर सेट करा. यामुळे घरात AC ची थंड हवा राहील आणि इलेक्ट्रिसिटी कंजप्शन कमी होईल.

AC चे फिल्टर साफ करा

AC चे फिल्टर वर सारखा जमा होत असल्या कारणामुळे त्याचा एअरफ्लो कमी होतो आणि AC वर प्रेशर पडतो, आणि इलेक्ट्रिसिटी कंजप्शन जास्त होतो. त्यामुळे नियमित AC चे फिल्टर साफ करत रहा.

घरात AC ते वेंटिलेशन

AC ता एअरफ्लो बरोबर डायरेक्शनमध्ये असायला हवा. कारण खिडकी जर उघडी असेल तर गरम हवा घरात येते. आणि परत घर कुलिंग होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे AC चालू असताना घरातील खिडक्या बंद ठेवा.

पंख्याचा वापर

घरात AC जास्त कुलिंग झाल्यावर AC बंद करा आणि पंखा चालू करा त्यामुळे घरात तशीच कुलिंग राहते आणि AC वर प्रेशर नाही पडत.

वेळेवर AC बंद ठेवा

कधीही AC चा गरज नसल्यावर वापर करू नका. घरात कोणी नसल्यावर AC बंद करून बाहेर पडा.

या गरजेच्या टिप्स जर तुम्ही पालन केल्यातर नक्की तुमच्या AC च्या वीज बिलमध्ये घट होईल आणि तुम्हाला वीज बिलाचा त्रास होणार नाही.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.