रक्षाबंधनचा सण अवघ्या दोन दिवसांवर आहे. अशा वेळी रक्षाबंधनला घरीच बनवा 'या' हेल्दी मिठाई!

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

जर कोणी साखर किंवा मधुमेहाचा रुग्ण असेल तर साखरेची मिठाई खाल्ल्याने समस्या आणखी वाढू शकतात.

Image Source: Pinterest

बाहेरच्या मिठाईतील भेसळ आणि साखरेचा अतिवापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.

Image Source: Pinterest

त्यामुळे तुम्ही घरीच हेल्दी मिठाई बनवून कुटुंबाकडून कौतुक मिळवू शकता.

Image Source: Pinterest

नाचणीचे लाडू

हा पदार्थ एखाद्या सुपरफूडपेक्षा कमी नाही कारण त्यात लोह, कॅल्शियम, लोह, फायबर आणि इतर अनेक पोषक तत्वांचा समावेश असतो.

Image Source: Pinterest

खजूर बर्फी

खजूरच्या बर्फीमध्ये नैसर्गिकरित्या साखर असते. त्यात फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स देखील असतात. आरोग्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे.

Image Source: Pinterest

नारळ आणि गुळाची बर्फी

यामध्ये रिफाइंड साखरेऐवजी कंडेन्स्ड मिल्क घाला. गूळ हा देखील एक आरोग्यदायी पर्याय आहे, कारण त्यात लोह आणि अनेक खनिजे असतात.

Image Source: Pinterest

ओट्स आणि बदाम पुडिंग

मिठाईऐवजी पुडिंगचा पर्यायही तुम्ही ट्राय करू शकता. यासाठी ओट्स तुपात तळून त्यात बदामाची पूड टाका. थोडा भाजून झाल्यावर त्यात गूळ, वेलची आणि दूध घालून शिजू द्या. तुमचा चविष्ट पुडिंग तयार आहे.

Image Source: Pinterest

चिया पुडिंग आणि फळं

चिया सीड्समध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. नाश्त्यात हे खाल्ल्याने आरोग्य निरोगी राहील.

Image Source: Pinterest

रक्षाबंधनसाठी या आरोग्यदायी मिठाई तुम्ही घरच्या घरी करुन खाऊ शकता.

Image Source: Pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: Pinterest