थंड पाण्याचा स्पर्श मेंदूला लगेच सक्रिय करतो. यामुळे डोळ्यांची सुस्ती दूर होते आणि शरीर ऊर्जावान वाटतं.
झोपण्यापूर्वी किमान 1 तास मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीचा वापर टाळा.स्क्रीनची ब्लू लाईट झोपेवर वाईट परिणाम करु शकते.
दररोज एकाच वेळी झोपणं आणि उठण्याची सवय लावा. यामुळे झोप चांगली लागते आणि सकाळी सहज उठता येतं.
डोळे उघडताच खिडकी उघडा किंवा थोडा वेळ उन्हात उभे राहा. सूर्यप्रकाशामुळे शरीराला दिवस सुरू झाल्याचा संदेश मिळतो.
अलार्म बिछान्यापासून दूर ठेवा, जेणेकरून बंद करण्यासाठी उठावं लागेल.यामुळे उठण्याची सवय लागते.
उठल्यावर बिछान्यात बसूनच थोडं स्ट्रेचिंग किंवा योगासनं करा. यामुळे रक्तप्रवाह वाढतो आणि झोप आपोआप दूर होते.