आपल्या सौंदर्यात केसांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो.
त्यामुळे प्रत्येकाला आपले केस काळे आणि दाट हवे असतात.
थायरॉईड रोग आणि व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता, ही पांढऱ्या केसांची सर्वसामान्य कारणे असतात.
मात्र, मानसिक ताणतणाव हेदेखील केस पांढरे होण्यामागचे कारण असू शकते.
जर तुम्हाला पांढरे केस कमी करायचे असतील तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत आणि खाण्याच्या सवयींमध्ये काही बदल करावे लागणार आहेत.
तुम्ही दररोज 7 ते 8 तास चांगली झोप घ्यावी.
रोजच्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचे प्रमाण वाढवावे. आठवड्यातून एकदा उपवास ठेवावा.
जर तुमच्या डोक्यावरील पांढऱ्या केसांची संख्या कमी असेल तर ते तुम्ही उपटून काढू शकता.
सफेद केस काळे करण्यासाठी तुम्ही कडिपत्त्याचा उपयोग करून घेऊ शकता.
चहा पावडरमध्ये नैसर्गिक गुणधर्म असतात जे केसांना काळे करण्यासाठी आणि मजबूत बनविण्यास मदत करतात.
सफेद केसांसाठी जास्वंदीच्या फुलाचा वापर अत्यंत परिणामकारक होतो.