आतल्या गोड पाण्यापासून बाहेरच्या टणक कवचापर्यंत सगळे भाग वापरले जातात.
रोजच्या बोलण्याचालण्यातही नारळ आल्याशिवाय रहात नाही.
असा कुठला उत्सव आहे जात नारळ वापरत नाहीत? गणपती बाप्पाच्या प्रसादातला नारळ असो किंवा ईदच्या शीरखुर्मातला!
सत्कार करताना दिलेला नारळ आणि नोकरीवरून काढून टाकताना दिलेला नारळही आहेच.
नारळ फोडून गोड निघाला तर खोबऱ्याच्या वड्या, दडपे पोहे, सोलकढी आणि कितीतरी जिन्नस होतात.
खवाट निघालं तर पाण्यात उकळून वर तरंगणारं कच्च तेल म्हणूनही वापरता येतं.
मग टाचांना पडलेल्या भेगा असोत की केसांना लावायला, घरगुती औषध!
नारळाचा कोणताही भाग वाया जात नाही. म्हणून त्याला श्रीफळ म्हणतात.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही)